दिल्लीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता केजरीवाल सरकारने सम-विषम योजनेची घोषणा केली होती. या योजनेसंदर्भात गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. दुचाकी वाहनांना सम-विषम योजनेमधून दिलासा देण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. त्यासोबतच रविवारी सम-विषम योजनेचे नियम लागू होणार नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal: The scheme will be applicable from 8 am to 8 pm, except on Sundays. Violating the odd-even scheme will incur a fine of Rs 4000. https://t.co/iDmvTa1Ev2
— ANI (@ANI) October 17, 2019
मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
राजधानी दिल्लीमध्ये येत्या ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही सम-विषम योजना लागू होणार आहे. या योजनेसंदर्भात आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, 'रविवार सोडून इतर दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सम-विषम योजनेचे नियम लागू होणार आहेत. सम-विषम योजनेचे उल्लंघन केल्यास ४ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. २०१६ मध्ये दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेल्या या योजनेचे नियम तोडणाऱ्यांना २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
गोविंदाच्या पत्नीला नको होती 'सपना', कृष्णा एपिसोडमधून गायब
तसंच, 'इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांना देखील सम-विषम योजना लागू होणार आहे. ही योजना फक्त चार चाकी वाहनांना लागू होणार आहे. दुचाकी वाहनांना या योजनेतून सूट देण्यात आली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना या योजनेतून सूट मिळालेली नाही.' असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
भाजप यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना धमकावतेय- अशोक
दरम्यान, 'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यसभा आणि लोकसभा नेते, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री यांच्या वाहनांना या योजनेतून सूट देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, यीपीएससी अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयुक्त, उपसभापती राज्यसभा, लोकसभा उपाध्यक्ष, दिल्लीचे उपराज्यपाल, दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश, लोकायुक्त आणि आपत्कालिन सेवा देणाऱ्या वाहनांना सुध्दा सूट देण्यात आली आहे.