पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्णांना हलविण्यासाठी सुरक्षा पुरवा, दिल्ली हायकोर्टात मध्यरात्री सुनावणी

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री हायकोर्टात सुनावणी झाली.

ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार करता यावे, यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी आवश्यक सुरक्षा दिली जावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांना दिले. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात रात्रीच्या वेळी सुनावणी झाली. 

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राची वृत्तवाहिन्यांसाठी सूचना

मंगळवारी रात्री साडेबारा वाजता या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस मुरलीधर यांच्या निवासस्थानी सुनावणी झाली. या सुनावणीला दिल्लीचे पोलिस सहआयुक्त आलोक कुमार आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेश देव उपस्थित होते. दिल्ली सरकारचे वकील संजॉय घोष हे सुद्धा सुनावणीवेळी उपस्थित होते. 
दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचारात गंभीर जखमी झालेले अनेक जण अल हिंद रुग्णालयात दाखल आहेत. पण त्यांच्यावर पुढील उपचारांसाठी त्यांना जीटीबी रुग्णालयात हलविणे गरजेचे आहे. तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. हा विषय ज्येष्ठ वकील सुरूर मंदेर यांनी न्यायाधीशांपुढे फोनवरून उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणी मंगळवारी रात्रीच सुनावणी घेण्यात आली.

हिंसाचारात जखमी झालेल्यांना अल हिंद रुग्णालयातून हलविण्यासाठी पुरेशा सुरक्षेसह रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी सुरूर मंदेर यांनी आपल्या याचिकेत केली. त्यावरून न्यायालयाने दिल्ली पोलिसांना हे आदेश दिले आहेत. 

७२ कोटींचा बँक घोटाळा; राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक

या सुनावणीवेळी सुरूर मंदेर यांनी स्पीकर फोनच्या माध्यमातून अल हिंद रुग्णालयाचे डॉ. अन्वर यांच्याशी न्यायाधीशांचे संवाद घडवून आणला. यावेळी डॉ. अन्वर यांनी अल हिंद रुग्णालयात सध्या दोन मृत तर २२ जखमी रुग्ण दाखल आहेत, असे सांगितले. या रुग्णांवर पुढील उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. पण दिल्ली पोलिसांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.