पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरविंद केजरीवाल-अमित शहांची भेट, दिल्लीच्या विकासासाठी करणार एकत्र काम

अरविंद केजरीवाल आणि अमित शहा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. अरविंद केजरीवाल आणि अमित शहा यांची ही पहिलीच भेट आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत.

अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एक सदिच्छा भेट होती. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीच्या विकासावर चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली होती. यावेळी बऱ्याचदा ते आक्रमक झालेले सुध्दा दिसले.

तुमच्यासारखे इतरांचेही हक्क आहेत, आंदोलकांशी मध्यस्थीचा प्रयत्न

या भेटीबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, 'आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. खूप चांगली भेट झाली. दिल्लीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दिल्लीच्या विकासासाठी एकत्र काम करु या मुद्द्यावर आम्ही दोघे ही सहमत होतो.'

'केंद्राच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे तापस पॉल यांचा मृत्यू'

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने भाजपचा पराभव केला. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये आपने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त ८ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.    

संभाजी भिडेंना बेळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर