पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान, २४ तासांनतर निवडणूक आयोगाची माहिती

दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान, २४ तासांनतर निवडणूक आयोगाची माहिती (Photo: Burhaan Kinu/ Hindustan Times)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या २४ तासानंतर निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी जाहीर केली. दिल्लीत यावेळी ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. वर्ष २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ६७.४७ टक्के मतदान नोंदवण्यात आले होते. एकूण मतदानात ६३.५५ टक्के मतदान महिलांनी आणि ६२.६२ टक्के मतदान पुरुषांनी केले आहे. 

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

निवडणूक आयोगाने म्हटले की, प्रत्येक बुथवरुन मतदानाची माहिती प्राप्त झाल्यानंतर अंतिम आकडेवारी जारी करण्यात आली आहे. दरम्यान, मतदानाची टक्केवारी जारी करण्यास उशीर होत असल्याबद्दल आपने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला होता. 

रामदास आठवलेंना डॉक्टरेट, डी.वाय पाटील विद्यापीठ गौरवणार

शनिवारी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. त्यामुळे प्रत्येक बुथवरुन आकडे येण्यास वेळ लागला. ती आकडेवारी जुळवून निष्कर्ष काढण्यास वेळ लागला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांना देण्यात आलेल्या मोबाइल फोनमध्येही बिघाडाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण डेटा येण्यास वेळ लागला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी देण्यास वेळ लागल्याचे दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त रणबीर सिंह यांनी सांगितले.