पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत-पाक महामुकाबला' ट्विटमुळे BJP नेत्याविरोधात FIR

भाजप (संग्रहित छायाचित्र)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मॉडल टाउन मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपने कपिल मिश्रा एका ट्विटमुळे अडचणीत सापडले आहेत. दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केल्यामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मुख्य निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते.  

...म्हणून पुणेकरांनी कोरोनाच्या विषाणूला घाबरण्याचे काम नाही

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा उल्लेख त्यांनी 'मिनी पाकिस्तान' असा केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मिश्रा यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करताना आगामी निवडणुक ही भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला आहे, असे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटमुळे निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.  

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरतीः IMF

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांना उद्देशून मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्याप्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांनी मिश्रा यांना गुरुवारी नोटीस पाठवली होती. इलेक्ट्रॉनिक मीडियातील वृत्तानुसार दिल्लीमध्ये तुकड्या तुकड्यात शाहीनबाग झाल्याचे वक्तव्य केल्याचे दिसून येते. शाहीनबागमध्ये पाकची एन्ट्री आणि दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला या विधानावर शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण द्यावे, असा उल्लेखही निवडणूक आयोगाने या पत्रात केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Chief Electoral Officer has asked Delhi Police to file FIR against BJP leader Kapil Mishra over his tweet