पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNUला मोदींचे नाव द्या, भाजप खासदाराची मागणी

हंसराज अहीर

दिल्लीतील भाजपचे खासदार हंसराज हंस हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी जवाहरलाल विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी त्यांनी जेएनयूतील एका कार्यक्रमातच केली आहे. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० वरही आपले मत व्यक्त केले. त्यांनी कार्यक्रमात सहभागी लोकांना संबोधित करत म्हटले की, सर्व शांततेत होवो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. बॉम्बस्फोट होऊ नयेत. मी तर म्हणतो की, जेएनयूचे नाव बदलून ते एमएनयू केले पाहिजे. मोदींच्या नावानेही काही तरी असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

'गांधी-नेहरु परिवाराशिवाय काँग्रेस चालवणे कठीण'

ते पुढे म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी चुका केल्या आणि त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. कोणत्याही बाजूचे लोक मारले गेले तरी मरतो तो एका आईचा मुलगाच. हे ठीक नाही. 

याचे नाव जेएनयू का आहे ?, असा सवाल त्यांनी केला. त्यावर उपस्थितांनी याला जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणतात असे सांगितले. यावर हंस यांनी यांच्यामुळेच (काश्मीर) काही तरी झाले होते, असे म्हटले. मी तर म्हणतो की..ऐकण्यास विचित्र वाटेल..याचे नाव एमएनयू करुन टाका. मोदींजीच्या नावेही काहीतरी असायला हवे. 

देशात मोठी मंदी पण सरकारचे मौनच, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दरम्यान, हंसराज हंस हे उत्तर-पश्चिम दिल्लीचे खासदार आहेत. या मतदारसंघात दलित नेते उदित राज यांच्याऐवजी त्यंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर नाराज उदित राज यांनी काँग्रेमध्ये प्रवेश केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi BJP MP Hans Raj Hans speaks in JNU on Article 370 abrogation says change the name of JNU to MNU