पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: भाजप नेत्याने पक्ष कार्यालयाबाहेर पत्नीला केली मारहाण

भाजप नेत्याने पत्नीला केली मारहाण

दिल्लीमध्ये भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पत्नीला मारहाण करणाऱ्या भाजपच्या जिल्हा अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महारौलीचे भाजप जिल्हा अध्यक्ष आझाद सिंह यांनी प्रदेशकार्यालयाबाहेर पत्नीला मारहाण केली. आझाद सिंह यांच्या पत्नी सरिता चौधरी दिल्लीच्या माजी महापौर आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप प्रदेश कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. दिल्लीचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु होती. बैठकीमध्ये दिल्लीच्या माजी महापौर सरिता चौधरी यांनी उपस्थिती लावली होती. बैठकीतून बाहेर आल्यानंतर सरिता चौधरी या एका खासदारांसोबत बोलत होत्या. त्याच दरम्यान त्यांचे पती आझाद सिंह त्याठिकाणी आले आणि त्यांनी सरिता यांना मारहाण केली.

नरेंद्र मोदींचे स्वागत... आणि दिलगिरीही, तुलसी गबार्ड यांचा संदेश

घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांमधील भांडण मिटवले. त्यानंतर संतप्त झालेल्या सरिता यांनी पोलिसांना फोन लावला. सरिता चौधरी आणि आझाद सिंह हे एकत्र राहत नाही. गेल्या अनेक वर्षापासून पती-पत्नींमध्ये वाद सुरु आहे. या घटनेला गांभिर्याने घेत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आझाद सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी जिल्हा सरचिटणीस विकास तंवर यांना कार्यवाहक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. 

स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी