पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोलचा अंदाज दुपारी ३ पर्यंतचा, त्यानंतर भरघोस मतदानः भाजप

मनोज तिवारी

दिल्लीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. परंतु, भाजपने ४८ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख खासदार मनोज तिवारी यांनी शेवटच्या ३-४ तासांत झालेल्या मतदानाच्या आधारे हा दावा केला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस बी एल संतोष यांनीही असाच दावा केला आहे. त्यांनी टि्वट करुन अखेरच्या २ तासांत १७ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. 

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

मनोज तिवारी यांनी दावा केला की, इव्हीएमचे आकडे दुपारी ३ वाजेपर्यंतचे आहेत. तर ३ नंतर भाजपच्या बाजून भरघोस मतदान झाले आहे. त्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या आपवर हल्लाबोल केला आहे. तिवारींनी म्हटले की, दुपारी ३ वाजेपर्यंत वर-खाली होऊ शकते. एक्झिट पोलवाले स्वतःच सांगत आहेत की त्यांच्याकडील डेटा हा ३ वाजेपर्यंतचा आहे. पंरतु, ३ ते ७ वाजेपर्यंत भाजपच्या बाजूने भरघोस मतदान झाले आहे. आपनेही ३ वाजेनंतर त्यांच्या बाजूने भरघोस मतदान झाल्याचा दावा केला आहे. ११ तारखेची वाट पाहा, सर्व समोर येईल.

दिल्ली मतदानाची टक्केवारी अजून जाहीर नाही, आपचा ECला सवाल

दरम्यान, तिवारी यांनी काँग्रेसवर निकालापूर्वीच शरणागती स्वीकारल्याचा आरोप केला. काँग्रेस संभ्रमावस्थेत आहे. त्यांच्या काही जागा येऊ शकतात. परंतु, अरविंदर सिंह लवलीसारख्या उमेदवारांना त्याच्याच पक्षाचे लोक पराभूत करण्यासाठी कामाला लागले होते, असे त्यांनी म्हटले.