पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वांचे अंदाज फेल ठरतील, माझं टि्वट जपून ठेवाः मनोज तिवारी

मनोज तिवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन विविध वृत्त वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एक्झिट पोलवर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि खासदार प्रवेश वर्मा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून अंतिम निकाल यापेक्षा पूर्णपणे वेगळे असतील असे म्हटले आहे. 

...तर आम्ही राहुल गांधींना अंडे फेकून मारुः रामदास आठवले

मनोज तिवारी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, हे सर्व एक्झिट पोल फेल होतील. माझे हे टि्वट जपून ठेवा. भाजप दिल्लीत ४८ जागा जिंकून सरकार बनवेल. कृपया ईव्हीएमला दोष देण्याचा बहाणा आतापासूनच शोधू नका.

Delhi Exit Poll:दिल्लीत पुन्हा केजरी सरकार

तर पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही निवडणुकीच्या निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. प्रवेश वर्मांच्या मते भाजप ५० जागा जिंकून सरकार स्थापन करेल. तर आम आदमी पक्ष १६ आणि काँग्रेसच्या खात्यात ४ जागा जाऊ शकतात. 

दरम्यान, बहुतांश एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला ५५ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळू शकतात. तर भाजप १५ ते २६ दरम्यान जागा जिंकण्याचा अंदाज आहे. सुदर्शन न्यूज आणि टाइम्स नाऊने आपल्या एक्जिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक २६ जागा दाखवल्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा आहेत आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी ३६ आमदारांची गरज आहे.

...आणि सचिन तेंडुलकरने स्वीकारले महिला क्रिकेटपटूचे चॅलेंज