पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगाल तिथं येईल, मला गोळी मारा, ओवेसींचं अनुराग ठाकूरांना आव्हान

असदुद्दीन ओवेसी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो..' या घोषणेचा एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला आहे. 'मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, माझ्यावर गोळी झाडता येईल, अशी भारतातील एक जागा त्यांनी निश्चित करावी, मी येण्यासाठी तयार आहे,' असे ओवेसी म्हणाले.

कन्हैयाकुमारपेक्षा शरजील इमाम खतरनाकः अमित शहा

ओवेसींनी अनुराग ठाकूर यांना उत्तर देताना म्हटले की, 'माझ्या मनात कोणी भीती निर्माण करु शकत नाही. कारण मोठ्या संख्येने माझ्या माता आणि भगिनी रस्त्यावर आले आहेत. त्यांनी देशाला वाचवण्याचा निर्णय घेतला आहे.' 

भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वादग्रस्त घोषणा ऐकू येतात. व्हिडिओत ठाकूर हे मंचावरुन घोषणा देताना दिसत आहेत. 'देश के गद्दारों को...' अशी ठाकूर यांनी घोषणा दिल्यानंतर मंचाच्या खालून 'गोली मारो...' असे उत्तर देण्यात येत आहे.

'अमित शहांच्या सांगण्यावरुन प्रशांत किशोर यांना पक्षात घेतलं'

अनुराग ठाकूर यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसनेही यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने मंगळवारी त्यांना नोटीसही जारी केली आहे. निवडणूक आयोगाने ठाकूर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Assembly Elections 2020 Asaduddin Owaisi Slams BJP leader Anurag Thakur for his desh ke gaddaron ko remarks