पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताचा आत्मा वाचवल्याबद्दल दिल्लीवासीयांचे आभारः प्रशांत किशोर

अरविंद केजरीवाल आणि प्रशांत किशोर

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आता बहुतांश स्पष्ट झाला आहे. दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार येणार हे निश्चित झाले आहे. निकाल स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी टि्वट करुन दिल्लीच्या जनतेचे आभार मानले आहेत. 

'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'

प्रशांत किशोर यांनी मतमोजणीत कल स्पष्ट होताच टि्वट केले. भारताचा आत्मा वाचवल्याबद्दल दिल्लीच्या जनेतेचे आभार, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

आतापर्यंत आलेल्या कलानुसार ७० पैकी ५७ जागांवर आप तर १३ जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. 

दिल्लीकरांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली: नवाब मलिक

दुसरीकडे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, ईव्हीएम टेंपर प्रूफ नाही. कोणताही विकसित देश याचा उपयोग करत नाहीत. त्यांनी याबाबत टि्वट केले आहे. ते म्हणाले की, चिपवाली कोणतीही मशीन टेंपर प्रूफ नाही. कृपया, एक मिनिटासाठी विचार करा की विकसित देश ईव्हीएमचा उपयोग का करत नाहीत?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Delhi Assembly Election Results Prashant Kishor tweet after Wiinig AAP in Trends Delhi chunav parinam