पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रडणारे विकास करु शकत नाहीत, PM मोदींचा सोनिया गांधींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्लीतील द्वारका येथील प्रचार सभेत ते बोलत होते. दिल्लीतील आगामी निवडणूक या दशकातील पहिली निवडणूक आहे. या निकालावर देशाच्या विकासाची समीकरणे ठरतील. याचा नक्की विचार करा, असे सांगत त्यांनी दिल्लीकरांनी भाजपला मतदान करावे, असे म्हटले आहे.  

महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख केलाच नाही : अनंतकुमार हेगडे

आरोप करत बसणाऱ्यांच्या हातात दिल्ली देऊन विकास होणे शक्य नाही. देशाची राजधानी ही दिशा देणाऱ्यांच्या हातात हवी. योजनेला स्थगित करुन दिल्लीचा विकास रोखणाऱ्यांना अद्दल घडवायला हवी, असे सांगत त्यांनी केजरीवाल सरकारवर तोफ डागली. याशिवाय बाटला हाऊसचा दाखला देत सोनिया गांधी काँग्रेसवरही निशाणा साधला. बाटल हाऊसमधील घटनेबद्दल रडणारे देशाचा विकास करु शकत नाहीत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी ताजमहालही विकतील, राहुल गांधींचा टोला

सुधारित नागरिकत्व कायदा, कलम ३७० यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील निर्णयावर सरकारसोबत असणाऱ्यांची सत्ता दिल्लीमध्ये यायला हवी, असे सांगताना मोदींनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला. बाटला हाऊसमधील दहशतवाद्यांसाठी काहीजण अश्रू ढाळू शकतात. पण दिल्लीचा विकास करु शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींवर नाव न घेता टोला लगावला. मोदींच्या प्रचारसभेमध्ये हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे नेते  दुष्यंत चौटाला देखील उपस्थित होते. दिल्ली विधानसभेच्या ७० जागेंसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi assembly election 2020 pm narendra modi target arvind kejriwal and sonia gandhi in dwarka rally