दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. याचदरम्यान काही नेत्यांकडून प्रक्षोभक वक्तव्येही केली जात आहेत. 'दिल्लीत भाजपची सत्ता आली तर एका महिन्याच्या आत सरकारी जमिनीवरील सर्व मशिदी हटवण्यात येतील', असे पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी एका सभेत म्हटले.
'केंद्राने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल'
वर्मा यांनी म्हटले की, 'जेव्हा दिल्लीत माझे सरकार आले तर ११ फेब्रुवारीनंतर एका महिन्यात माझ्या लोकसभा मतदारसंघातील सरकारी जमिनीवर जेवढ्या मशिदी आहेत, त्या सर्व हटवू. एकही मशीद मी सोडणार नाही.'
CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीनबाग मुद्द ऐरणीवर आला आहे. प्रवेश वर्मा म्हणाले की, जर दिल्लीत सत्ता आली तर एका तासात शाहीन बाग रिकामी करु. कोण आंदोलन करत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. सीएएला समजून घ्याचेच नाही, हा त्यांचा हेतू आहे.
अशोक चव्हाणांची बोलण्याची पध्दत चुकीची: नवाब मलिक
एवढ्यावरच न थांबता वर्मा पुढे म्हणाले की, काश्मीरप्रमाणे दिल्लीच्या एका कोपऱ्यात आग लागली आहे. हे लोक तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारतील. मोदी नसतील तर हे लोक तुम्हाला कापून टाकतील, असे म्हणत त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या देशातील गद्दारांना गोळी घातली पाहिजे या वक्तव्याचे समर्थन केले.
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAला देण्यास पुणे पोलिसांचा नकार
शाहीनबागेत लाखो लोक जमा झाले आहेत. दिल्लीतील जनतेला विचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल. ते तुमच्या घरात घुसतील. तुमच्या बहीण-मुलीवर बलात्कार करतील. त्यांची हत्या करतील. आज वेळ आहे, उद्या मोदी आणि अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत. उद्या जर कोणी दुसरा पंतप्रधान झाला तर देशातील जनता स्वतःला असुरक्षित होतील, असे प्रक्षोभक वक्तव्यही केले.