पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आपच्या बंडखोर आमदाराला BJPचे तिकीट

कपिल मिश्रा

आम आदमी पार्टीतून (आप) भाजपत सहभागी झालेले माजी मंत्री कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत मॉडेल टाऊन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते करावल नगर मतदारसंघातून विजयी झाले होते. भाजपचे मोहनसिंह बिश्त यांचा त्यांनी ४४ हजार मतांनी पराभव केला होता. 

अ‍ॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरील वक्तव्यावर पीयूष गोयल म्हणाले..

तिकीट मिळाल्यानंतर कपिल मिश्रा यांनी भाजपचे आभार मानले. त्यांनी टि्वट करुन म्हटले की, मॉडेल टाऊनमधून उमेदवारी मिळाल्यामुळे प्रकाश जावडेकरजी, मनोज तिवारीजी यांचे मनापासून आभार मानतो. मॉडेल टाऊनच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन हा मतदारसंघ मोदीजींना मिळवून देऊ. 

मुलीच्या न्यायासाठी लढतेय, राजकारणात रस नाही; निर्भयाच्या आईचे स्पष्टीकरण

आपच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना कपिल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले होते. त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले होते. त्यानंतर त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही काढण्यात आले होते. केजरीवालवर त्यांनी ४०० कोटी रुपयांच्या टँकर घोटाळ्याचा आरोप केला होता. 

केरळः आरटीआयअंतर्गत पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाचे पुरावे मागितले

दुसरीकडे, पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत २ ऑगस्ट २०१९ ला कपिल यांना विधानसभेतून निष्कासित करण्यात आले होते. त्यानंतर १७ ऑगस्टला भाजपत प्रवेश केला होता.