जामिया मिलिया इस्लामिया अल्युमनी असोसिएशनने भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, दिल्लीचे खासदार परवेश वर्मा आणि मॉडेल टाऊनचे भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी जामियाजवळ त्यांच्या भाषणांमुळे तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली, असल्याचा आरोप या तिन्ही नेत्यांवर करण्यात आला आहे.
अर्थसंकल्प २०२० : ... या मुद्द्यांकडे असणार सर्वांचे लक्ष
जामिया मिलिया इस्लामिया अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष शिफा उर रहमान खान यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी संघटनेने या पूर्ण प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. पुढे त्यांनी असे सांगितले की, 'आम्ही अनुराग ठाकूर, परवेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी प्रवृत्त केल्यामुळे ही घटना घडली आहे. ज्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. याप्रकरणाचा तपास व्हावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे.'
कोरोना विषाणू : ३२४ भारतीयांना चीनमधून विशेष विमानानं परत
शिफा उस रहमान खान यांनी पुढे असे सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीची एक प्रत गृह मंत्रालय, दिल्ली पोलिस आयुक्त आणि दक्षिण दिल्ली पोलिस उपायुक्त यांना पाठवली आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांना पत्र लिहिले आहे. जामिया परिसरात तरुणांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी आपने केली.