पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिन बाग आंदोलनाचा निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो, अंतर्गत सर्वेक्षण

दिल्लीत शाहिन बागमध्ये सुरू असलेले आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन्ही मुद्द्यांवरून गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत शाहिन बागमध्ये आंदोलन करणाऱ्यामुळे भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा गेल्यावेळेपेक्षा खूप वाढतील. पक्षाला ३० ते ३५ जागा मिळतील, असा अंदाज अंतर्गत सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. या संपूर्ण घडामोडींशी संबंधितांनी हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली.

सांगाल तिथं येईल, मला गोळी मारा, ओवेसींचं अनुराग ठाकूरांना आव्हान

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दोन प्रमुख नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिन बागमधील आंदोलन हे निवडणुकीचे चित्र बदलण्यास उपयुक्त ठरू शकते. शाहिन बागमध्ये गेल्या ४० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या महानगरातील एक प्रमुख मार्ग बंद झाला आहे. त्या भागाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. यामुळे दिल्लीकरांमध्ये नाराजी आहे. 

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन्हीविरोधात दिल्लीमध्ये त्याचबरोबर संपूर्ण देशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र पालटू शकते. 

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकत मोठे यश संपादन केले होते. पण या निवडणुकीत चित्र बदलू शकते. भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते, असेही या नेत्याने सांगितले.

कन्हैयाकुमारपेक्षा शरजील इमाम खतरनाकः अमित शहा

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या स्थितीत मोठी सुधारणा झालीये ही वस्तुस्थिती आहे. शाहिन बागमध्ये जे सुरू आहे. त्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच मनिष सिसोदिया यांनी शाहिन बागेतील आंदोलनाला आपला पाठिंबा दिल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल.