पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीः IGI विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाला अटक

दिल्लीः IGI विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाला अटक (प्रतिकात्मक छायाचित्र)

स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवस आधी सोमवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर गुप्तचर संस्था आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर पोलिसांनी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला अटक केली. दरम्यान, संशयिताने धमकी दिल्याचा आरोप फेटाळला आहे. 

'भारत-चीन यांच्यातील मतभेदाचा प्रभाव द्विपक्षीय संबंधावर नको'

रात्री उशिरा या घटनेला विमानतळाचे पोलिस उपायुक्त संजय भाटिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, रात्री सुमारे साडेआठ वाजता विमानतळाच्या टर्मिनल २ वर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन दिल्ली पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. धमकी देणाऱ्याने विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. जर स्फोट थांबवायचा असेल तर थांबवून दाखवा, असे त्याने म्हटले.

पाकिस्तानची कटूता: भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास नकार

ही माहिती मिळताच बीटीएसीचे पथक विमानतळावर दाखल झाले. बीटीसीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, दिल्ली पोलिस, विमानतळ प्राधिकरण, गुप्तचर विभाग आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाचा कसून तपासणी केली. पण या पथकाला काहीच संशयास्पद वस्तू मिळाल्या नाहीत. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत बीटीसीचे पथक विमानतळावर तैनात होते.