पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : शेंगा, बिस्किटं, मटणाच्या तुकड्यांमधून ४५ लाखांची तस्करी

शेंगा, बिस्किटं, मटणाच्या तुकड्यांमधून ४५ लाखांची तस्करी

भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटं, मटणाच्या तुकड्यांमधून तब्बल ४५ लाखांची तस्करी करणाऱ्या इसमास दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. खाद्यपदार्थांच्या आत लपवलेल्या ४५ लाख मुल्यांच्या तब्बल ५०० कोऱ्या करकरीत नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

राज्यसभा निवडणूक : सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच?

आतापर्यंत तस्करीची अनेक प्रकरणं समोर आली मात्र अशाप्रकारे भुईमुगाच्या शेंगातून किंवा शिजवलेल्या मटनातून चलनाची तस्करी करण्याचं  प्रकरण  पहिल्यांदाच समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुराद अली या २५ वर्षीय इसमाला अटक केली आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. दिल्लीहून तो दुबईला जात होता. 

शपथविधीसाठी इतर कोणत्याही पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण नाही

विमानतळावर आल्यानंतर अलीचं वागणं संशयास्पद होतं. दुबईला जाणाऱ्या या व्यक्तीकडे शेंगा, बिस्किटं, मटणाचा रस्सा यांसारखे खाद्यपदार्थ काय करत आहे अशी शंका अधिकाऱ्यांना आली. त्यांनी अलीच्या बॅगेची झडती घेतली. प्रत्येक पदार्थ उघडून पाहिल्यावर अत्यंत शिताफीनं त्यात परकीय चलन लपवलं असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. 

शेंगदाण्यामधला गर काढून त्यात नोटांची व्यवस्थीत गुंडाळी करून ठेवण्यात  आली होती.  शेंगदाण्याची टरफलं अत्यंत काळजीपूर्वक चिटकवण्यात आली होती. तस्करीचा हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले. अलीनं यापूर्वीही  परकीय चलनाची तस्करी केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

गे डेटिंग अ‍ॅपमुळे सीईओसह ५० हून अधिक वरिष्ठ अडकले हनीट्रॅपमध्ये