पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू 11 गंभीर जखमी

दिल्ली इमारत आग

दिल्लीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. दक्षिण दिल्लीच्या झाकिरनगर भागामध्ये सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अटक

झाकीरनगर भागामध्ये असलेल्या इमारतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमध्ये जखमी झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कारण ज्या भागामध्ये ही आग लागली तो रस्ता लहान असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्यची शक्यता वर्तवली जात आहे. इमारतीच्या तळमजल्यावर सुरुवातीला आग लागली. हळूहळू ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यावर पसरत संपूर्ण इमारतीला आगीने वेढले. या आगीमध्ये इमारतीमधील सर्व प्लॅट जळून खाक झाले. त्याचसोबत इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन अनेकांनी उड्या मारल्या असल्याची माहिती समोर येत आहे.  

मोदी सरकारने काश्मीरचा 'कॅन्सर' उखडून काढला : अनुपम खेर