पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थान: लष्कराच्या ट्रकला अपघात, ३ जवानांनी गमावले प्राण

सैन्याच्या ट्रकला अपघात

राजस्थानमध्ये लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३ जवानांचा मृत्यू झाला तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानच्या बाडमेर येथे बुधवारी ही घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या जवानांना लष्कराच्या रुग्णालयात 
उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी लष्कराच्या ट्रकला बारमेरमधील चौहटन डोंगराजवळ अपघात झाला. ट्रक डोंगरावरुन कोसळला. या अपघातामध्ये ३ जवानांचा मृत्यू झाला. तर  ३ जवान गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चौहटन पोलिस आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या जवानांना ताबडतोब लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'