पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नौदल नियुक्ती : संरक्षण मंत्रालयाने बिमल वर्मांची याचिका फेटाळली

अ‍ॅडमिरल बिमल वर्मा

नौदलातील व्हाईस अ‍ॅडमिरल बिमल वर्मा यांनी व्हाईस अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांच्या नौदल प्रमुख पदाच्या नियुक्ती विरोधात केलेली याचिका संरक्षण मंत्रालयाने शनिवारी फेटाळली. करमबीर सिंह यांची नियुक्ती करताना ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिमल वर्मा यांनी केला होता. 

संबंधित प्रकरणातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करमबीर सिंह यांची नियुक्ती नियमानुसार झाली असून ज्येष्ठता हा एकमेव मुद्दा असू शकत नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. सिंह यांच्या नियुक्ती विरोधात वर्मा यांनी सैन्य लवादाकडे दाद मागितली होती. या लवादाने २६ एप्रिल रोजी संरक्षण मंत्रालयाला तीन आठवड्यात वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय घेण्यास सांगितले होते.  

लष्करातील जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

योग्य मापदंड आणि नियमावलीच्या माध्यमातूनच  नौदल प्रमुख पदी करमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचिका दाखल करणारी व्यक्ती (बिमल वर्मा) या पदासाठी पात्र नव्हते, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याप्रकरणात लवाद २० मे रोजी सुनावणी करेल.