पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीओकेतील भारतीय लष्कराच्या कारवाईवर संरक्षण मंत्र्यांची नजर

राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतीय लष्कराने पीओकेत कारवाई केलीय. भारताच्या या प्रत्युत्तरानंतर संरक्षण मंत्रालयही अलर्ट झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे स्वतः याप्रकरणी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या संपर्कात आहेत. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही भारताच्या हल्ल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख रावत हे सोमवारी लडाख दौऱ्यावर येण्यापूर्वीच पाकिस्तानने गोळीबाराआड दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला. 

भारताची POKमध्ये कारवाई; दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाकचे ५ सैनिक ठार

पाकिस्तानी सैनिकांनी आज सकाळी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना कव्हर देण्यासाठी अंदाधुंद गोळीबार केला. याला उत्तर देताना भारतीय लष्कराने पीओके येथील दहशतवाद्यांच्या तळावर निशाणा साधला. हाती आलेल्या वृत्तानुसार पीओकेतील ७ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. 'नवभारत टाइम्स'च्या वृत्तानुसार या हल्ल्यात २२ दहशतवादी आणि ११ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

पाकिस्ताननेही भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पीओकेत मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. पण पण त्यांनी एकच सैनिक मारला गेल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंगने मारल्या गेलेल्या सैनिकाचे नाव लान्स नायक जाहिद असल्याचे म्हटले आहे. दोन सैनिक जखमी झाल्याचे सांगताना मात्र दहशतवादी तळांवरील हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीवर मौन बाळगले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Defence Minister Rajnath Singh has spoken to Army Chief General Bipin Rawat over the situation following the ceasefire violation by Pakistan Army