पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्यावरून हिंसक आंदोलने दुर्दैवी आणि वेदनादायी - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागरिकत्व कायद्यातील बदलांनंतर देशाच्या काही भागात सुरू असलेले हिंसक आंदोलन दुर्दैवी आणि तीव्र वेदनादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काही समाजद्रोही गटांकडून समाजात फूट पाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस

नरेंद्र मोदी म्हणतात, लोकशाहीमध्ये चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. पण सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून लोकशाहीत काहीच साध्य होऊ शकत नाही. भारताबाहेर केवळ अल्पसंख्य असल्यामुळे वर्षानुवर्षे ज्यांना हालाखीचे आयुष्य जगावे लागले आणि ज्यांच्याकडे राहण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही, अशाच लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये करण्यात आला आहे, याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.

उन्नाव बलात्कारः भाजपचा निलबिंत आमदार कुलदीप सेंगर दोषी

नागरिकत्व कायद्यातील बदलांनंतर देशाच्या काही भागात हिंसक घटना घडताहेत. जामिया मिलिया विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ येथे विद्यार्थी आंदोलन करताहेत. आसाममध्येही कायद्यातील बदलांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये रविवारी संतप्त आंदोलकांनी बसची जाळपोळ केली. दिल्ली पोलिसांच्या गाड्याही पेटविण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केले.