पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU कँम्पस परिसरातील आंदोलनात अभिनेत्री दीपिकानेही लावली हजेरी

दीपिकाने JNU कँम्पस परिसरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली (PC Vipin Kumar)

जेएनयू कँम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशात संतापाची लाट उसळली आहे. कँम्पसमधील हाणामारीच्या प्रकाराचा देशभरातील विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे. जेएनयू कँम्पसबाहेर या घटनेच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनने मंगळवारी जेएनयू परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीच्या माध्यमातून तिने आंदोलनकर्त्यांना समर्थन दिल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक कलाकारांनी उघडपणे जेएनयूमधील प्रकारावर आपली भूमिका मांडली आहे. त्यात आता दीपिकाही पुढे सरसावल्याचे दिसून आले. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा 

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कँम्पसमध्ये रविवारी विद्यार्थी आंदोलनावेळी अज्ञातांनी कँम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना अमानूषपणे मारहाण केली होती. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत जवळपास ३६ विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेचा देशभरातून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

VIDEO: गुजरातमध्ये ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार हिंसाचाराच्या घटनेच्या दोन दिवसानंतर पुढे आले आहेत. मंगळवारी त्यांनी विद्यापीठातील शांततेसाठी प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांनी शांतता राखून सेमिस्टरसाठी नोंदणी करत नव्याने सुरुवात करावी. हे विद्यापीठ वैचारिक चर्चेचं व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. हिंसाचाराबद्दल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone outside Jawaharlal Nehru University to support students protesting against JNU Violence