पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवाद्यांकडे पाक रेंजर्सचा पोशाख, पठाणकोटसारख्या हल्ल्याची शक्यता

दहशतवाद्यांकडे पाक रेंजर्सचा पोशाख, पठाणकोटसारख्या हल्ल्याची शक्यता

काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्यास भारत तयार आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दहशतवादी शिबिरात सुरु असलेल्या हालचाली आणि भारतात हल्ला करण्याचा कट रचत असलेल्या पाकिस्तानी संघटनांच्या हालचालींवर भारतीय गुप्तचर संस्था लक्ष ठेवून आहेत. 

भारताने कलम ३७० हटवल्यानंतर पाककडून रचण्यात येत असलेल्या कटाची माहिती अमेरिकन संस्थांना दिली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाक लष्कर आणि आयएसआयच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. 

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इच्छुक

पठाणकोटसारख्या हल्ल्याची शक्यता

भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानी संघटनांची गुप्त योजना डिकोड केली आहे. या योजनेनुसार पाकिस्तानचे लष्कर पठाणकोटसारखा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घुसखोरांना काश्मीरमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

दहशतवाद्यांना पाक रेंजसर्चा पोशाख दिला

सुरक्षा दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे कृत्य तणाव वाढवणारे आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याशिवाय पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली आक्रमक दिसत आहे. दहशतवाद्यांना पाक रेंजर्सच्या पोशाखात पुढे करण्यात आले आहे. तणाव वाढवून आंतरराष्ट्रीय समूहाला दखल देण्यास भाग पाडण्याची पाकिस्तानची योजना आहे.

काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Decode By Intelligence Agency Terrorist in Pakistani Rangers Dress Plan Pathankot Type Attack