पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय लवकरच

मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी

वयाची ७५ ओलांडल्यामुळे लोकसभा निवडणूक न लढविलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आता पक्ष राज्यसभेत पाठविणार का, हे येत्या आठवड्याभरात स्पष्ट होईल. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. अनुभवी सदस्यांना या सभागृहात संधी दिली जाते. त्यामुळे आता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना या सभागृहात पाठविण्यात येईल का, हे पाहणे उत्सुकतचे आहे.

देशातील बँकांमध्ये एका वर्षात ७१ हजार कोटींचे घोटाळे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५४३ जागांपैकी ३०३ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन केली. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडला. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले आहे. भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद' असे धोरण असल्यामुळे अमित शहा येत्या काही दिवसांतच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदावरही नवीन नेता येण्याची चिन्हे आहेत.

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांनीही लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली जाणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. २०१४ मध्ये या दोघांची पक्षाने मार्गदर्शक मंडळात नियुक्ती केली होती. लालकृष्ण अडवाणी हे देशाचे माजी उपपंतप्रधान राहिले आहेत. तर मुरली मनोहर जोशी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात काम केले आहे. 

EVM च्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी आंदोलन छेडणार

दरम्यान, लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतील सदस्यत्वासाठीही वयाची अट असावी, यावर भाजपमध्ये विचार सुरू असल्याचे एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने मंत्रिपदासाठी ७५ ही वयोमर्यादा निश्चित केली होती. ७५ वर्षांच्या वर असलेल्या कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले होते. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वयाची ७५ ओलांडलेल्या कोणालाही पक्षाने लोकसभेचे तिकीट दिलेले नव्हते. 
लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे दोघेही पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आहेत. पक्ष संघटनेच्या पुढील बैठकीत त्यांची भूमिका काय असेल, हे निश्चित केले जाईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.