पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणातील चारही दोषींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं जातंय, का माहितीये?

दिल्लीतील तिहार तुरुंग

देशातील सर्वात मोठ्या तिहार तुरुंगामध्ये सध्या कोणत्या कैद्यांवर सर्वाधिक लक्ष ठेवलं जातंय माहितीये... तुम्हाला वाटेल हे कैदी म्हणजे मुंबईचा कुख्यात छोटा राजन किंवा दिल्लीचा कुख्यात नीरज बावना असेल. पण तुमचे उत्तर चुकीचे आहे. सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात सर्वाधिक लक्ष निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींवर ठेवले जाते आहे. या चारही दोषींना येत्या १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. 

भीमा-कारेगाव तपास NIAकडे : फडणवीसांकडून स्वागत, थोरातांची टीका

तुरुगांधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मुकेश सिंग, पवनकुमार गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा यांना काही दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगातील ३ नंबरच्या बराकीमध्ये हलविण्यात आले. याच बराकीमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना ठेवले जाते. आता हे चारही दोषी फासावर जाण्यासाठी आत्महत्या करू नयेत, म्हणून त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवले जात आहे.

चारही दोषींना चार वेगवेगळ्या बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे. या चार बराकींवर सुरक्षारक्षकांचे सातत्याने लक्ष आहे. एक बराक सहा बाय आठ फूटांची आहे. बराकीच्या पुढील बाजूला लोखंडी सळ्यांचा दरवाजा आहे. या बराकीमध्ये वरच्या बाजूला कोणतीही लोखंडी सळई किंवा सिमेंटचा बीम नाही. संपूर्ण बराकीमध्ये कुठेही कापड ठेवण्यात आलेले नाही. प्रत्येक बराकीजवळ दोन सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात. चारही दोषी शौचालयात गेले तरी तिथे सुरक्षारक्षकांचे सातत्याने लक्ष असते. शौचालयाची रचनाही त्याच पद्धतीने करण्यात आली आहे.

... हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण, शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

प्रत्येक बराक दिवसातून दोन वेळा आतून तपासली जाते. बराकीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू नाही ना, हे बघितले जाते. प्रत्येक बराकीमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहे. या सीसीटीव्हीचे फुटेज नियंत्रण कक्षातून २४ तास बघितले जाते. 

फाशी देण्यात येणाऱ्या दोषींनी आत्महत्या करू नये, म्हणूनच ही सर्व खबरदारी घेतली जाते आहे. फाशी देण्यात आलेल्या कैद्यांवर याच पद्धतीने लक्ष ठेवले जाते.