पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलीच्या न्यायासाठी लढतेय, राजकारणात रस नाही; निर्भयाच्या आईचे स्पष्टीकरण

निर्भयाची आई

''मला राजकारणात अजिबात रस नाही. मी केवळ माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून लढतेय. तसेच तिच्यासारख्या अनेक मुलींच्या पाठी मी उभी राहणार. माझा लढा केवळ न्याय मिळवण्यासाठी आहे'', असं म्हणत निर्भयाच्या आईनं राजकारणात येण्याचं वृत्त खोडून  लावलं आहे. 

बेपत्ता 'डॉ. बॉम्ब'ला कानपूरमधून अटक

निर्भयाच्या आईला काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभेचे तिकीट मिळणार अशा चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, असंही म्हटलं जात होतं. मात्र राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचं निभर्याच्या आईनं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. 

तारापूर एमआयडीसी स्फोट: अखेर कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

 काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीशी मी बोलले नाही.  अशी बातमी का चर्चेत आली हेच मला ठावूक नाही असंही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे २०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यास उशीर झाल्याबद्दल निर्भयाच्या वडिलांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला जबाबदार धरले आहे.  निर्भया बलात्कार प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने सर्व चारही दोषींच्या विरोधात नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. या नव्या डेथ वॉरंटनुसार आता २२ जानेवारी ऐवजी सर्व दोषींना एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली.  

निर्भया बलात्कार प्रकरणः नवीन डेथ वॉरंट जारी, १ फेब्रुवारीला फाशी