निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकविण्यासाठी जल्लाद दिल्लीतील तिहार तुरुंगात दाखल झाले आहेत. गुरुवारीच ते तिहार तुरुंगात दाखल झाले. त्यांनी तुरुंगातील बराक क्रमांक तीनजवळील फाशीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ठिकाणाची पाहणीही केली. सिंधी राम असे या जल्लादाचे नाव आहे. पवन जल्लाद म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते मूळचे मेरठमधील रहिवासी आहेत. उद्या, १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात येईल.
CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन
तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दोषीला फाशी देण्यासाठी जल्लादाला १५ रुपये दिले जातात. जर शनिवारी चारही दोषींना फाशी देण्यात आली तर सिंधी राम यांना एकूण ६० हजार रुपये देण्यात येतील.
फाशीची शिक्षा नेमकी जिथे दिले जाते त्या ठिकाणाची गुरुवाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर दोषींना फाशी देण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा आढावाही घेण्यात आला आहे. फाशीसाठी ज्या दोरखंडाचा वापर करण्यात येणार आहे. त्याचीही तपासणी करण्यात आली. पवन जल्लाद यांनी आतापर्यंत एकावेळी दोघांना फाशी दिली आहे. पण यावेळी पहिल्यांदाच ते एकावेळी चौघांना फासावर लटकविणार आहेत. त्यामुळेच ते लवकरच तिहार तुरुंगात दाखल झाले आहेत.
पवन जल्लाद यांचे वडील मामू सिंह आणि आजोबा कल्लू जल्लाद हे सुद्धा दोषींना फासावर लटकविण्याचे काम करायचे. मेरठमधील काशीराम कॉलनीमध्ये पवन जल्लादचे घर आहे.
जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते श्रीनगरकडे
मुकेश सिंह, पवनकुमार गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चारही दोषींची नावे आहेत.