पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणातील दोषी विनयने आपटले भिंतीवर डोके, किरकोळ जखमी

विनय शर्मा

निर्भया बलात्कार प्रकरणातील एक दोषी विनय शर्मा याने आपले डोके कारागृहाच्या बराकीतील भिंतीवर आपटून स्वतःला जखम करून घेण्याचा प्रयत्न केला. तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. १६ फेब्रुवारीला ही घटना घडली.

कोरोनाच्या बळींचा आकडा २००० पार, IAF च्या विमानाचे उड्डाण उशिराने

तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला विनय शर्मा याने स्वतःला जखम करून घेण्याचा प्रयत्न केला. १६ फेब्रुवारीला त्याने त्याच्या बराकीतील भिंतीवर डोके आपटले. त्याला या घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे.

तामिळनाडूतील बस- ट्रकच्या भीषण अपघातात २० जण ठार, १५ गंभीर जखमी

या प्रकरणातील चारही दोषींना येत्या ३ मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतील न्यायालयाने त्यांचे डेथ वॉरंट नव्याने जारी केले आहे. फाशी देण्यासाठी तिहार तुरुंगात सर्व व्यवस्था आधीपासून तयार करण्यात आली आहे. मेरठमधून जल्लादही लवकरच तुरुंगात दाखल होणार आहे.