पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. या चारही आरोपींची या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी; ३५ जण ठार

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. या चौघेही तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. तुरुंगात मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप करत दोषिंच्या वकिलांनी कोर्टात नवीन याचिका दाखल केली. तर निर्भयाच्या कुटुंबीयांनी चारही दोषींच्या विरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

सरकारी वकील उज्वल निकम यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. आरोपी फाशी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. या निकालानंतर ते उच्च न्यायालयाचा दाद मागू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. आठ वर्षांपूर्वी, १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत निर्भयावर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या अत्याचारामुळं गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Death Warrant issued to the Rapists and killers of Nirbhaya case patiyala house court on death warrant plea