सांप्रदायिक दंगलीच्या सुमारे एक आठवड्यानंतर दिल्लीतील स्थितीत सुधारणा झाली असली तरी अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. या परिसरात मोठ्याप्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. दंगलीतील मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. सोमवारी दिल्लीतील दंगलीतील मृतांची संख्या ४७ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ३८ जणांचा मृत्यू गुरु तेग बहादुर रुग्णालयात, तीन जणांचा लोकनायक रुग्णालयात, ५ राममनोहर लोहिया तर एकाचा जगप्रवेश रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रविवारी गोकलपुरी आणि शिव विहार परिसरातील नाल्यात आणखी चार मृतदेह आढळून आले. परंतु, पोलिसांनी या मृतदेहांचा दंगलीशी काही संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले.
Video: रविनानं केला रिक्षानं प्रवास, तिला पाहून चालकाचा आनंद गगनात मावेना
Delhi: Death toll rises to 46 now; (38 at Guru Teg Bahadur Hospital, 3 at Lok Nayak Hospital, 1 at Jag Parvesh Chander Hospital & 4 at Dr. Ram Manohar Lohia Hospital) in North East Delhi violence. pic.twitter.com/XWvboAduLM
— ANI (@ANI) March 2, 2020
ईशान्य दिल्लीतील काही भागांमध्ये लोकांना रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. दंगलीनंतर बँक आणि एटीएम बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत २५४ तक्रारी आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ९०३ लोकांना अटक करण्यात आली आहे. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत ईशान्य दिल्लीमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन, त्यांनी केले आहे.
दीपिकाच्या 'द इंटर्न'मधून ऋषी कपूर घेणार माघार?
पोलिसांनी सांगितले की, गोकुळपुरी परिसरातील नाल्यात रविवारी दोन मृतदेह आणि शिवविहार येथील नाल्यात दोन मृतदेह सापडले. उल्लेखनीय म्हणजे बुधवारपासून आतापर्यंत गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित यांच्याह अनेक दंगल पीडितांचे मृतदेह नाल्यात सापडले आहेत.