पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीलंका हल्ल्यातील मृतांचा आकडा १०० ने घटला

श्रीलंका दहशतवादी हल्ला

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत आलिशान हॉटेल्स आणि चर्चमध्ये दहशतवादी हल्ला झाला. आठ बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला. यात ५०० हून अधिकजण जखमी झाले तर २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.  दहशतवादी हल्ल्यात एकूण ३५९ नागरिक मृत्युमुखी पडल्याचा आकडा जाहीर करण्यात आला. मात्र श्रीलंकन आरोग्य मंत्रालयानं  हा आकडा मागे घेतला आहे.  आता बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा हा २५३ असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा १०० ने घटला आहे.

आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार या हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ही ३५९ नसून २९० असल्याचं आधी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र माध्यमांनी हा आकडा फुगवून सांगितला. बॉम्बस्फोटात शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे झालेत म्हणूनच मृतांची  ओळख पटवणंही अशक्य होत आहे. या कारणामुळेच मृतांचा एकूण आकडा सांगण्यात अडचणी येत आहेत. मात्र आरोग्य मंत्रालयानं आता मृतांचा अधिकृत आकडा हा ३५९ नसून २५३ असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. 

तर या हल्ल्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  हे हल्ले घडवणारे हल्लेखोर  देशातील लोकप्रिय मसाला व्यापाऱ्याची मुले असल्याचं तपासात समोर आले आहे. मसाला व्यापारी मोहम्मद यूसूफ इब्राहिम यांना या हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोहम्मद यांची मुले इल्हाम अहमद इब्राहिम आणि इमसथ अहमद इब्राहिम या दोघांनी स्वत:ला शांग्री-ला आणि सिनेमॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आत्मघाती हल्ला करत स्फोट घडवून आणला. बंगले, गाड्या, अमाप संपत्ती असणाऱ्या या कुटुंबातील दोन मुलांनी स्वत:ला उडवून दिले तर सुनेही स्वत:ला उडवून देत स्फोट घडून आणला. स्फोटात सहभागी असणारे सर्वच आत्मघाती हल्लेखोर हे इब्राहिम कुटुंबाच्या मित्र परिवारातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Death toll in Sri Lanka Easter attacks lowered by more than 100 In a statement the health ministry