पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील कोरोनाच्या बळींचा आकडा वाढला!

कोरोना

देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमण दिवसागणिक वाढतानाचे चित्र आहे. बिहारमधील दुसऱ्या बळीसह देशातील कोरोनाच्या मृतांचा आकडा आता सात वर जाऊन पोहचला आहे. आपर्यंत देशात ३४० हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रातही रविवारी कोरोना विषाणूने एका वयोवृद्धाचा बळी घेतला होता. राज्यातील हा दुसरा बळी ठरला. 

३१ मार्च पर्यंत रेल्वेसेवा बंद, देशाची वाटचाल लॉक डाऊनच्या दिशेने

कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन करण्यात आले होते. परिणामी रविवारी देशभरातील नागरिकांनी घरामध्ये राहून 'जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. कोणतीही लस उपलब्ध नसलेल्या कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी टाळणे हाच एकमेव पर्याय असल्यामुळे सरकार या अनुषंगाने योग्य ती कठोर पावले उचलत आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्यपर्यंत प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईकरांची 'लाइफ लाइन' ३१ मार्चपर्यंत बंद, प.रे. आणि म.रे.चा निर्णय

कोरोना विषाणूने देशात घातलेल्या थैमानामुळे देशाची वाटचालही लॉक डाऊनच्या दिशेने सुरु आहे. सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करुन जनतेने या लढ्यात 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून सकारात्मकता दाखवली असून सद्यपरिस्थिती आणखी किती दिवस राहणार याचे अनुमान  तुर्तास कोणालाही लावता येणार नाही. योग्य वेळी सरकार बंद केलेल्या सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न निश्चित करेल, पण तोपर्यंत देशातील मोठे संकट थोपवण्यासाठी नागरिकांना संयम दाखवावा लागणार आहे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Death toll due to COVID 19 rises to 7 in India second death reported from Maharashtra And Bihar Health Ministry