तुम्ही लढवय्ये आहात. कोरोनाच्या जाळ्यातून तंदुरुस्त होऊन बाहेर पडाल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बळ दिले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
RBIचा हफ्ते स्थगित करण्याचा बँकांना फक्त सल्ला, पण...
बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. होती. कोरोनाशी लढा देत असताना सरकारी जबाबदारी देखील सक्षमपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एवढेच नाही तर लवकर बरे व्हावे अशी भावनाही व्यक्त केली आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये बोरिस जॉनसन यांना टॅग करत लिहिलंय की, तुम्ही लढवय्ये आहात. कोरोनावर मात करुन तुम्ही या आजारातून बाहेर पडाल. तुमच्यासह ब्रिटनमधील नागरिकांना चांगले आरोग्य लाभो हिच सदिच्छा, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.
लॉकडाऊन: मुंबईतलं 'हे' कुटुंब ८०० लोकांसाठी झालं अन्नदाता
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची लागण झालेला आकडा ९ हजारहून अधिक झाली आहे. खुद्द पंतप्रधानांचाही यात समावेश असल्यामुळे ब्रिटनला मोठा धक्का बसला आहे. जगभरामध्ये कोरोना विषाणूचा थैमान पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात २४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी कोरोनामुळे मृत्यू झाला असून लाखो लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत