पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती

दत्ता पडसलगीकर

राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि सध्याचे उपलोकायुक्त दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही माध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, दत्ता पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहायक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. 

तिढा सुटणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुंडांच्या आणि टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या होत्या. मुळचे सोलापूरचे असलेले दत्ता पडसलगीकर यांनी २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास कामात महत्त्वाची भूमिका निभावली होती. मुंबईत अरूण गवळी टोळीचे कंबरडे मोडण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवायांची त्यावेळी प्रशंसा करण्यात आली होती.

भारताला पाठिंबा देणाऱ्या देशावर क्षेपणास्त्र डागू, पाक मंत्री बरळले

दत्ता पडसलगीकर यांनी गुप्तचर विभागात (आयबी) प्रतिनियुक्तीवरही काही वर्षे काम बघितले आहे. त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. ते १९८२ च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत.