पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम

अयोध्या राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला २५ एप्रिल रोजी होणार्‍या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर सुरुवात होण्याची शक्यता आहे. राम मंदिर बांधकामासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राम मंदिराचे बांधकाम सुरु करण्याच्या तारखेची घोषणा केली जाणार आहे. राम मंदिर बांधकामाचे काम कोणत्या कंपनीला द्यायचे याचा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. 

लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू

ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांच्या मते, २५ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाच्या आसपास कोणत्याही शुभ दिवशी मंदिराचे बांधकाम सुरू होऊ शकते. लार्सन अॅण्ड टुब्रो यासारख्या अनेक कंपन्या मंदिर बांधकामासाठी प्रतिष्ठित कंत्राट मिळवण्याच्या शर्यतीत आहेत, असे त्यांनी सांगितले. 

अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

चौपाल यांनी पुढे असे सांगितले की, १ फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे झालेल्या ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत मंदिराचे बांधकाम राम नवमीला सुरू करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसंच, 'राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिराचे बांधकाम सुरू करून जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेला आव्हान मिळू शकते. म्हणून आम्ही आणखी एक संभाव्य तारीख निवडण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. 

हिंदुंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका : फडणवीस

मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आणखी एका बैठकीत ट्रस्टचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी सहयोगी नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर बांधकाम समितीच्या तयारीच्या अहवालावर चर्चा करतील. दरम्यान, यापूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांनी संकेत दिले होते की राम मंदिराचे बांधकाम अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरच सुरु होऊ शकते. 

उद्धव ठाकरे म्हणाले, PM मोदींनी मला वचन दिले!