पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून पोलिसांच्या फौजफाट्यात निघाली नवरदेवाची वरात

परशुराम मेघवाल असे या घटनेतील नवरदेवाचे नाव आहे

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात नवरदेवाची वरात काढण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जिल्ह्यातील संगवाडामध्ये हा प्रकार घडला. या घटनेतील नवरदेव दलित समाजातील आहे. गावातील जातीय समीकरणांमुळे पोलिसांनी या वरातीसाठी सुरक्षा पुरविली होती.

अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्मितीची पंतप्रधानांकडून घोषणा

संगवाडा गावातील वरिष्ठ जातीतील लोक या स्वरुपाच्या वरातीला विरोध करतील म्हणून नवरदेवाच्या विनंतीवरूनच पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती. परशुराम मेघवाल असे या घटनेतील नवरदेवाचे नाव आहे. ते जिल्ह्यातीलच सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विवाह बारन जिल्ह्यातील तरुणीशी मंगळवारी झाला. या विवाह सोहळ्याआधी नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. 

केजरीवालांच्या लेकीचा भाजपच्या २०० स्टार प्रचारकांना सवाल

वरात काढण्यासाठी आपल्याला विरोध होऊ शकतो. त्यामुळे पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी परशुराम मेघवाल यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. तसे पत्र त्यांनी दिले होते. त्यांच्या याच पत्राची दखल घेऊन प्रशासनाने या विवाह सोहळ्यासाठी पोलिस संरक्षण दिले. वरातीसाठी ८० पोलिस आणि इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही अनुचित घटनेविना वरात व्यवस्थितपणे पार पडली.