पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टाटा समूहामध्ये कोणतीही भूमिका बजावण्यात रस नाही : सायरस मिस्त्री

सायरस मिस्त्री

सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामधील संघर्षमयी प्रकरणात तीन वर्षानंतर नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएएलटी) सायरस मिस्त्री यांना दिलासा दिला होता. एन. नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी केलेली निवड बेकायदा असून सायरस मिस्त्रींकडे पुन्हा जबाबदारी द्यावी, असे नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने म्हटले होते. मात्र टाटा समुहामध्ये कोणत्याही पदावर कार्यरत राहण्यास इच्छुक नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. रविवारी एका पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का? अमित शहा

टाटा समुहाचे हित हे माझ्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा उच्चस्थानी आहे. हे लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रकामध्ये केलाय. नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलच्या (एनसीएएलटी) निर्णयाविरोधात टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याच्या सुनावणीपूर्वी सायरस मिस्त्रींनी कोणतेही पद भूषवण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे.  
नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने माझ्या बाजूने निकाल दिला असला तरी, मी समूहाच्या कोणत्याही पदावर काम करण्यासाठी इच्छूक नाही. अल्प शेअरधारकाच्या नात्याने माझ्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि कार्यकारी मंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

मनसेच्या इंजिनची दिशा बदलली, आता झेंड्याचाही रंग बदलणार ?

तीन वर्षांपूर्वी नाट्यमयरित्या टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इनव्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे (एनसीएलटी) दाद मागितली होती. सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय कंपनीच्या कायद्यानुसार नाही असा दावा यावेळी करण्यात आला होता. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने हा दावा फेटाळून लावल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी  नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलकडे धाव घेतली. होती.  आता सायरस मिस्री यांना याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती पुन्हा करण्यात यावी, असे आदेश नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने  दिले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Cyrus Mistry said I will not be pursuing the executive chairmanship of Tata Sons or directorship of TCS