पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वायू'मुळे मान्सूनचा वेग मंदावला, केरळ आणि तामिळनाडूतच मुक्काम

मान्सून

उत्तर भारतात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साधारणपणे जूनच्या मध्यात मान्सून बिहार, झारखंडमधून पूर्व उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करतो. पण यंदा त्यात सातत्याने विलंब होताना दिसत आहे. मान्सून केरळ आणि तामिळनाडूनमध्येच अडकला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तो सक्रीय होण्याची शक्यता आहे. 

वायू चक्रीवादळ: मुंबई किनारपट्टीवरही अलर्ट

हवामान विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांनंतर मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. तो पश्चिम बंगाल आणि सिक्किम करत पूर्वोत्तर भागात जाईल. त्यानंतर देशातील अन्य भागात सक्रीय होईल. पण यामध्ये सातत्याने विलंब होत आहे. केरळमध्ये मान्सून एक आठवडा उशिरा आला आहे. वायू चक्रीवादळामुळे हा उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.