पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलबुल चक्रीवादळामुळे अलर्ट जारी; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

बुलबुल चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरामध्ये 'बुलबुल' चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या दोन दिवसांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळचा फटका पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांमध्ये बुलबुल चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार आहे. या चक्रीवादळाची तीव्रता पाहता हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांनी परत येण्यास यावे. तसंच पुढचे आदेश मिळत नाही तोपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.  

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलबुल चक्रीवादळ कोलकातापासून ९३० किलोमीटर दक्षिण- दक्षिणपूर्व अंतरावर आहे. गुरुवारी रात्रीपासून हे चक्रीवादळ आणखी मजबूत झाले आहे. शनिवारी हे चक्रीवादळ आणखी रौद्ररुप धारण करेल. ज्यामुळे समुद्राची स्थिती प्रतिकूल होऊ शकते. हे चक्रीवादळ उत्तर-उत्तर-पश्चिमेला पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. 

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार

बुलबुल चक्रीवादळ ७० ते ८० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. तर चक्रीवादळाच्या केंद्रास्थानी त्याचा वेग ९० किलोमीटर प्रतितास ऐवढा आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, जर बुलबुल चक्रीवादळाने अधिक रौद्ररुप धारण केले तर ११५ तो १२५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळाच्या केंद्रस्थानी हा वेग १४० किमी प्रतितास असेल.

कोणाच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊत