पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायबर हल्ले, सर्जिकल स्ट्राइकचा सामना करण्यासाठी ३ नविन सुरक्षा एजन्सी

भारतीय लष्कराचे जवान

सर्जिकल स्ट्राईक, सायबर हल्ले आणि अवकाश युध्दांचा सामना करण्यासाठी पुढील काही महिन्यांत तीन नवीन सुरक्षा एजन्सीची निर्मिती केली जाणार आहे. तिन्ही दलाच्या सैन्यांच्या मदतीने स्थापन होणाऱ्या या एजन्सीचे प्रमुख थेट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) यांना अहवाल देतील. ज्यांची नियुक्ती या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

सरकार नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात फेरविचार करेल : मुख्यमंत्री

डिफेन्स सायबर एजन्सी (डीसीए), डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी (डीएसआरए) आणि आर्म्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन डिव्हिजन(एएफएसओडी) या तीन नव्या सुरक्षा एजन्सींची निर्मिती करण्यात येणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या सुरक्षा एजन्सी सक्रिय केल्या जातील. सुत्रांच्या माहितीनुसार या सुरक्षा एजन्सी थेट सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या अंतर्गत ठेवल्या जातील. 

अफगाणिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; ४८ जणांचा मृत्यू

मागील प्रस्तावानुसार, चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांना अहवाल सादर करण्यात येत होता. मात्र, आता सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जे पद तिन्ही दलापेक्षा उच्च असेल. नवीन प्रस्तावानुसार तयार होणाऱ्या तिन्ही सुरक्षा एजन्सी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या अंतर्गत काम करतील. 

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास, भाजपत प्रवेश करणारः राणे

तिन्ही नवीन सुरक्षा एजन्सींना मान्यता देण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाच्या परिषदेत या एजन्सींच्या स्थापनेस मान्यता दिली होती. त्यानुसार आता या एजन्सी स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तिन्ही सुरक्षा एजन्सीचे मुख्यालय दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात असणार आहे. या एजन्सीचे प्रमुख मेजर जनरल किंवा लेफ्टनंट जनरल या पदांच्या अधिकाऱ्यांना बनवले जाईल. या सुरक्षा एजन्सींमध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रतिनिधित्व केले जाईल.

पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा