पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा, त्यांचे मत जाणून घेणार

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. बैठकीमध्ये सुरुवातीला सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची टप्याटप्याने भेट घेण्यात येणार असून, त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठीची मते जाणून घेण्यात येणार आहेत.  

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात होते आहे. या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सर्व ६५ सचिवांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अहमद पटेल, ए के एँटनी, अशोक गेहलोत, गुलामनबी आझाद, मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणूगोपाल यांच्यामध्ये चर्चा झाली. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल, यावर बैठकीत सखोल चर्चा झाल्याचे समजते. राहुल गांधी यांनीच सर्वांनी सखोल चर्चा करून पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण असावा, हे ठरवावे, असे सांगितले असल्याचे स्पष्ट केले. 

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असणार, या संदर्भात वेगवेगळी नावे चर्चेत आहे. सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे काही काळ चर्चेत होती. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या पदासाठी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांचेही नाव सुचविले आहे. काही जणांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी आणि वेणूगोपाल यांचीही नावे सुचविली आहे. पण कोणत्याही नावाबद्दल अधिकृतपणे काहीही ठरलेले नाही.

पूरग्रस्तांच्या मदतकार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही - मुख्य सचिव

या आधी २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.