पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पण काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तूर्त नाही

सोनिया गांधी आणि राहुल गांधी (REUTERS FILE PHOTO)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर ठेवला आहे. परंतु, काँग्रेस कार्यकारणीने त्यांचा राजीनामा फेटाळला आहे. तरीही राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम असून यासाठी पुन्हा कार्यकारिणीची बैठक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले आहे. काँग्रेस कार्यकारिणीची अशी कोणतीही बैठक होणार नसल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणुगोपाळ यांनी या सर्व चर्चा आधारहिन असून कार्यकारिणीची अशी कोणतीही बैठक होणार नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या आणखा एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पक्षाची बैठक होणार नसल्याचे सांगितले. 

राहुल गांधींनी पद सोडू नये, कार्यकर्ते आत्महत्या करतील; चिदंबरम यांचे भावनिक आवाहन

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने २५ मे रोजी कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीतच राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला होता. त्याचवेळी कार्यकारिणीने एकमुखाने तो फेटाळला आणि संघटेनेची पुनर्रचना करण्याची मागणी केली होती. कार्यकारिणीने राजीनामा फेटाळूनही राजीव गांधी आपल्या मतावर ठाम होते. पण त्याचदरम्यान विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याची मालिकाच सुरु झाली.

पक्षाचा अध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राहुल गांधी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याला राजीनाम्यापासून देण्यापासून रोखू नये असे म्हटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर पटेल यांनी आपण राहुल गांधींना दैनंदिन कामकाजासाठी भेटायला गेल्याचे सांगितले. 

काँग्रेसच्या आणखी दोन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे

दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. झारखंड, आसाम आणि पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांनीही राजीनामे सादर केले आहेत. कर्नाटकचे प्रचार प्रमुख एच के पटेल यांनीही राजीनामा दिला आहे.