पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील

सोनिया गांधी

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्लूसी) गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. ज्यामध्ये शिवसेनेसोबत  महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला सीडब्लूसीकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

दिल्लीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, एके अँटोनी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा केली जाऊ शकते. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, सीडब्लूसीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या चर्चेबाबत आम्ही सीडब्ल्यूसीला माहिती दिली आहे.'

'सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचा संपर्क फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीशी'

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बुधवारी तब्बल ५ तास चर्चा झाली. मध्यरात्री ही बैठक संपली. त्यानंतर, शिवसेनेबरोबर समान कार्यक्रमाबाबत फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री असणार आहे. तर काँग्रेसकडे ५ वर्ष उपमुख्यमंत्री पद असणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. 

विजय माल्याच्या किंगफिशर हाऊसचा पुन्हा लिलाव