देशात मागील २४ तासांत १,७१८ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३३,०५० वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोना विषाणूचे देशातील संक्रमण रोखण्याच्या दृष्टिने सुरु असणारे प्रयत्नांना सकारात्मक यश मिळत आहे, असेही आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट होणारा आकड्याचा वेग आता मंदावला आहे. ११ दिवसांनी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होत आहे. हे दिवस वाढत जातील तसे आपण कोरनावर नियंत्रण मिळवू, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले
आरोग्य मंत्रालयाच संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मी, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, आणि पंजाब येथील डबलिंग रेट (कोरोना रुग्णांची दुप्पट होणारी वाढ) ११ ते २० दिवस इतका आहे. कर्नाटक लडाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ याठिकाणी २०ते ४० दिवसांच्या कालावधीने कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. असाम, तेलंगणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेशमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ४० दिवसांहून अधिक आहे.
पुण्यात कठोर निर्बंध! या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा
देशात आतापर्यंत १०७४ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मागील २४ तासांत ६३० रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा हा ८ हजार ३२५ वर पोहचला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी मागील १४ दिवसांच्या तुलनेत सुधारणेसह २५.१९ टक्के असा झालाय. कोरोनाचा देशातील मृतदर हा ३.२ टक्के इतका असून मृतांमध्ये ७ ८ टक्के लोक अन्य आजाराने त्रस्त होते, अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.