पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सभ्य लोकांनी मुलांना प्रियांका गांधींपासून दूर ठेवावे- स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रियंका गांधी

सभ्य कुटुंबातील लोकांनी आपल्या मुलांना प्रियांका गांधींपासून दूर ठेवले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओत प्रियांका यांच्यासमोर लहान मुलांचा समूह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत घोषणा देताना दिसत आहे. 

स्मृती इराणी म्हणाल्या की, त्या मुलांना शिव्या देण्यास शिकवत आहेत. त्यांनी मुलांना पंतप्रधानांना शिव्या देण्यास सांगितले. लहान मुलांचा वापर त्या राजकारणासाठी करु शकत नाहीत. मुले यापासून काय शिकणार. मी तर सर्व सभ्य कुटुंबांना सांगेन की, त्यांनी आपल्या मुलांना प्रियांका गांधींपासून दूर ठेवावे. मला आनंद आहे की, जो परिवार स्वतःला सभ्य समजतो त्याचा पर्दाफाश झाला आहे.

प्रियांका यांचा हा खरा चेहरा आहे. त्या पंतप्रधान आणि राज्याच्या प्रमुखांचा अनादर करत आहेत. त्यांनी गोरखनाथ मठाच्या अध्यक्षांचा अपमान केला आहे. ते हेच कृत्य गोरखपूरला करतील का, असा सवाल केला.

स्मृती इराणी पदवीधर नाहीतच!

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यांवरही निशाणा साधला. प्रियांका आपल्या त्या भावासाठी अमेठीत उभ्या आहेत ज्याने अमेठीचे मैदान सोडून पळ काढला आहे. प्रियांका या उमेदवार नाहीत. वास्तवात त्यांची उपस्थितीच राहुल यांचे अपयश दर्शवते, असा टोला त्यांनी लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cultured families should keep their children away from priyanka gandhi says smriti irani loksabha election 2019