पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुष्ठरोगावरील औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी, CSIRचा दावा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर वाढला आहे.

कोविड-१९च्या आव्हानाशी सामना करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) दिवसरात्र प्रयत्नरत आहे. याच अनुषंगाने त्यांनी कुष्ठरोगावरील उपचारासाठी तयार केलेले त्यांचेच एक औषध मायकोबॅक्ट्रियम डब्ल्यू (एमडब्ल्यू) हे कोरोना विषाणूवरील उपचारासाठी प्रभावी ठरेल असे म्हटले आहे. कोरोना विषाणूवरील उपचारासाठी याचा वापर करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल यांच्या परवानगीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल

जम्मू येथील सीएसआयआरची प्रयोगशाळा इंडियन इन्सिट्टयूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनचे संचालक डॉ. राम विश्वकर्मा यांनी 'हिंदुस्थान'शी बोलताना मायकोबॅक्ट्रियम हे मूलतः कुष्ठरोगावरील उपचारासाठी वापरले जात असल्याचे सांगितले. 

खबरदारीचा उपाय म्हणून धारावी परिसरातील २५०० लोक होम क्वारंटाइन

हे औषध शरीरात बाहेरील संक्रमण रोखण्यासाठी प्रतिरोधक क्षमता निर्माण करते. ज्याप्रकारे कोविड-१९ च्या संक्रमणात साइटोकाईन्सची अति सक्रियता दिसून आली. ती अत्यंत नुकसानकारक असल्याचे अंतर्गत अभ्यासात आढळून आले आहे. दरम्यान, साईटोकाईन्स रोगप्रतिकारक पेशींद्वारे उत्पन्न केले जाणारे प्रोटीन आहे. अनेक पेशींची यामुळे निर्मिती होते. याची उपस्थिती शरीरातील प्रतिरोधक तंत्र सक्रिय आणि नियंत्रित ठेवते. कोविड-१९ च्या संक्रमणात साईटोकाईन्स अति सक्रिय होतात आणि यामुळे प्रतिकारक तंत्र काम करत नाही, असेही आढळून आले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात १९० वर्षे जुना अमृतांजन पूल पाडणार

परवानगी मिळाल्यास रुग्णांवर उपचार

एमडब्ल्यूच्या डोसने ते नियंत्रित करुन या विषाणूविरोधात रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत केले जाईल. या औषधाच्या वापराने कोविड-१९ च्या विरोधात एक महत्त्वपूर्ण उपचार मिळेल, अशी शक्यता आहे. यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे, असे विश्वकर्मा यांनी म्हटले आहे. जर मंजुरी मिळाली तर एखाद्या मोठ्या रुग्णालयात रुग्णांवर याचा वापर केला जाईल. परंतु, हे औषध किती यशस्वी ठरेल, हे त्याच्या वापरानंतरच समजेल.