पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यादरम्यान सुरु असलेल्या 'प्राईस वॉर'मुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले आह

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्याची बातमी कोणालाही खरी वाटणार नाही. परंतु, हे सत्य आहे. कोरोनाच्या थैमानामुळे जगभरातील बहुतांश देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची मागणी घटली आहे. त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यादरम्यान सुरु असलेल्या 'प्राईस वॉर'मुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले आहेत. परिस्थिती अशी आहे की, एक लीटर कच्च्या तेलाचे दर हे बाटलीबंद पाण्याच्या एक लीटरच्या किमतीपेक्षा खाली गेले आहेत. सध्याच्या दरानुसार एका पिंपाच्या कच्च्या तेलाची भारतीय रुपयानुसार किंमत ही १५०० रुपये आहे. एका पिंपात १५९ लीटर कच्चे तेल असते. म्हणजेच एका लीटर कच्च्या तेलाचे दर हे ९.४३ रुपये प्रती लीटर इतके झाले आहे. भारतात पाण्याची एक लीटरची बाटली २० रुपयांना मिळते. 

कोविड- १९ : २४ तासांत विशेष तज्ज्ञांच्या समितीसह पोर्टल सुरु करा : SC

एएफपी या वृत्तसंस्थेच्या मते, आशियाई बाजारात मंगळवारी तेलाच्या किंमती या १८ वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्यानंतर किंमतीमध्ये थोडीफार तेजी दिसून आली. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे वाढलेल्या शंकांदरम्यान गुंतवणूकदारांनी धोरणकर्त्यांच्या निर्णयावर विश्वास दाखवला आहे. अमेरिकन मानक टेक्सास इंटरमीडिएट ७.३ टक्क्यांनी उसळून २१.५ डॉलर प्रती पिंप झाला. तर आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड ३.३ टक्क्यांच्या तेजीसह २३.५ डॉलर प्रती पिंप झाले होते. 

मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्यात सोमवारी तेलाच्या किंमतीवर चर्चा झाली. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात येणाऱ्या काळात उत्पादनावरुन सहमती होण्याची शक्यता आहे. 

भारत जगातील दुसरा सर्वांत मोठी तेल आयातदार देश आहे. गरजेच्या ८० टक्के तेल भारत आयात करतो. स्वस्त कच्च्या तेलाची संधी भारत गमवू इच्छित नाही. त्यामुळे भारताने कच्च्या तेलाचा अधिकाधीक साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्य सरकार रोज १० लाख लिटर दुधाची खरेदी करणार, हा आहे दर...

कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे भारताचा विदेशी चलनाचा खर्च कमी झाला आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर घसरले असले तीर भारत पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याऐवजी उत्पादन शूल्क वाढवून सरकारी खजिना भरुन घेत आहे. उत्पादन शूल्क एक रुपयाने वाढवल्यास सरकारला १३ हजार कोटी रुपयांचा लाभ होतो.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Crude oil became cheaper than water crude at 18 year low yet why prices of petrol and diesel are not reduced in India lockdown coronavirus