पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यंदाच्या संचलनात पहिल्यांदाच सीआरपीएफ महिला बायकर्सचे पथक

प्रजासत्ताक दिन २०२०

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बायकर्सचे पथक  पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.  हे पथक संचलनात चित्तथरारक कसरती करून सर्वांचं लक्ष वेधून घेतील हे नक्की. 

'फक्त कर्जमाफी नकोय, राज्यातील शेतकरी भिकारी नाहीत'

 या पथकामध्ये ६५ महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. ९० मिनिटे चालणाऱ्या या संचलनाच्या कार्यक्रमात ३५० सीसी क्षमतेच्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकलींवर हे पथक अॅक्रोबॅटिक कसरती दाखवणार आहे. 

दोन दिवसांपूर्वी हे पथक संचलनाच्या  सरावात सहभागी झाले होते. यावेळी संचलनात राफेल फायटर प्लेन, अपाचे हेलिकॉप्टरही  पहायला मिळणार आहे.  विशेष म्हणजे महिला सीआरपीएफच्या कवायती पहायला सर्वच उत्सुक आहेत. 

म्हणून अभिनवपणे विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल